Home » राष्ट्रीय » आ.धस यांचा गौप्यस्फोट : बीडमध्ये आजही आकाची टोळी !

आ.धस यांचा गौप्यस्फोट : बीडमध्ये आजही आकाची टोळी !

बीड : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आरोपी जेरबंद होवून कोर्टात सुनावणी सुरु असतांना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडची टोळी आजही बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा केला आहे. ‘आका’ची टोळी आजही कार्यरत आहे. एसीपी नवीन आहेत. त्यांना याची माहिती नाही. या लोकांनी यापूर्वी वॉचमनला मारहाण केली. त्यातून हे सर्वकाही घडले, असे ते म्हणालेत.

मस्साजोग येथील आवादा कंपनीत 2 दिवसांपूर्वी 12 लाख रुपयांच्या केबलची चोरी झाली होती. चोरट्यांनी कंपनीच्या वॉचमनला बांधून टाकून ही चोरी केली. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुरेश धस यांनी या प्रकरणी भाष्य करताना आकाची टोळी अजूनही जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा केला. ते आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, या लोकांनी दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण केली होती. आताही आकाच्याच एआखाद्या सहकाऱ्याने हे काम केले असेल. दोन दिवसांत आरोपी सापडेल. त्यांची टोळी आजही सक्रिय आहे. आकाने जागोजागी आपले लोक ठेवलेत. ते आजही आपले काम करत आहेत. त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. ते त्रासदायक आहेत.

सुरेश धस यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडची ईडी चौकशी करण्याचेही संकेत दिलेत. वाल्मीक कराड संदर्भात अजून बरेच काही सापडणार आहे. या प्रकरणी ईडीही चौकशी करणार आहे. ईडीने यापूर्वीच त्याला नोटीस बजावली होती. त्यात सर्वकाही सापडेल, असे ते म्हणाले. धस यांनी यावेळी परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख उचलण्यासाठी पोलिसांनी आपल्या गाड्या लावल्याचाही आरोप केला. राख उचलण्यासाठी पोलिसांनी आपल्या स्वतःच्या गाड्या लावल्या आहेत. कुणाचे टीप्पर, तर तर कुणाचा जेसीबी आहे, असे धस म्हणाले.

दुसरीकडे, मस्साजोगचे सरपंच संतोष देसमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. त्यात सरकारी वकिलांनी देशमुखांना आरोपींनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात सादर केला. तसेच हा व्हिडिओ बाहेर येऊ नये याची काळजी घेण्याची विनंतीही यावेळी कोर्टाला करण्यात आली. हा व्हिडिओ सार्वजनिक झाला तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे देशमु्खांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम या प्रकरणी बोलताना म्हणाले.

उज्ज्वल निकम आजच्या सुनावणीची माहिती देताना म्हणाले, न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले आहे. येत्या 24 एप्रिल रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी एका अर्जाद्वारे कोर्टात केली. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्याचा खुलासा मिळाला की, त्यावर रितसर सुनावणी होईल. वाल्मीक कराडने कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. त्यात त्याने माझा हत्याकांडात समावेश नाही व मी खंडणीही मागितली नाही असा दावा केला आहे. या माध्यमातून तो वाचवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *