यावल : प्रतिनिधी
गावाकडून डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाह वर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात होता. दरम्यान त्याच वेळी या तडवी कुटुंबावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात नऊ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी गंभीर चावा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव या गावातून डांभुर्णी कडे जाणारा रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहावर रविवारी किनगाव गावातील तडवी कुटुंब नवस फेडण्यासाठी गोड भातचा स्वयंपाक करत होते. दरम्यान त्याच वेळी मधमाशांनी या कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये फरीदा जावेद तडवी, नर्गीस रफीक तडवी, जावेद रशीद तडवी, अर्श जावेद तडवी, हमिदा रफिक तडवी, रफिक मुबारक तडवी, अंजुम रुस्तुम तडवी, जोया रुस्तम तडवी, जिशान रफिक तडवी हे नऊ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. व त्यांच्यावर येथे डॉ. तुषार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्ष पटेल, नेपाली भोळे, कादर तडवी यांनी उपचार केले दरम्यान या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी जबर चावा घेतला आहे.



