जळगाव : प्रतिनिधी
शहरातून निघालेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन राजेंद्र बन्सी भालेराव (वय ४५, रा. गेंदालाल मिल) या सफाई कर्मचाऱ्याला लोखंडी फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री दहा वाजेता फुले मार्केट समोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राजेंद्र भालेराव हे सफाई कर्मचारी वासतव्यास आहे. दि. १४ रोजी शहरातून निघालेल्या मिरवणुकीत नाचत होते. यावेळी मिरवणुक फुले मार्केट समोरुन जात असतांना नाचण्याच्या कारणावरुन त्यांचे धम्मा किशोर जाधव रा. गेंदालाल मिल यांचयसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने धम्मा जाधव याने लोखंडी फायटर सारख्या वस्तूने राजेंद्र भालेराव यांना मारहाण करीत जखमी केले. दरम्यान, राजेंद्र भालेराव यांनी शहर पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित धम्मा किशोर जाधव रा. गेंदालाल मिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करीत आहे.



