Home » जळगाव » दोन्ही कुटुंबिय समोरासमोर येताच झाली हाणामारी

दोन्ही कुटुंबिय समोरासमोर येताच झाली हाणामारी

जळगाव : प्रतिनिधी

कौटुंबिक तक्रारीच्या निवारणासाठी दोन्ही कुटुंबिय समोरासमोर येवून हाणामारी झाली. ही घटना सोमवार दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी एका कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती कार्यालयात कौटुंबिक वादासंबंधीत तक्रार दाखल होती. दोन्ही कुटुंबियांना समझोता करण्यासाठी त्याठिकाणी बोलाविले होते. दरम्यान, दोन्ही कुटुंबातील सदस्य समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारी झाल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी देखील झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करीत त्यांच्यातील वाद मिटवला त्यानंतर हाणामारीत जखमी झालेल्या महिलांनी तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी त्यांच्या मेडीकल मेमो देण्यात आला. त्यांनी उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *