Home » जळगाव » बस-टँकरची आमने-सामने धडक ; नऊ प्रवासी जखमी !

बस-टँकरची आमने-सामने धडक ; नऊ प्रवासी जखमी !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील महामार्ग क्रमांक ५४ वरील बाभळेनाग फाट्याजवळ दुपारी बस व टँकर यांच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या आपघातात ९ जण जखमी झाल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा येथून लोणी मार्गे २४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कासोदा बस (एमएच- १४, बीटी १८८१) जात होती. दरम्यान, बाभळेनाग फाट्याजवळ वळण आहे. चालकाने विरुद्ध साईडला जाऊन या बसला वळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी समोरून भरधाव वेगाने येणारा टैंकर (एमएच- १२, एक्सएम ६०५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील प्रवासी पारोळा तालुक्यातील सार्व येथील वत्सलाबाई काशिनाथ मकासरे, लोणी येथील प्रशांत प्रभाकर पाटील व अरुणाबाई नारायण पाटील, मोरफळ येथील कल्पना भीमराव पाटील, सटाणा तालुक्यातील जायखेडे येथील रंजना रमेश शिरसाठ व रमेश धर्मा शिरसाठ, कोपरगाव येथील लता विठ्ठल देसले तसेच मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील सुरेखा दिनेश देवरे व दिनेश यशवंत देवरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, महामार्गावरुन दोघेही वाहने भरधाव वेगाने जात असताना दोघांनीही समोर समोर आल्यानंतर जबर ब्रेक मारल्याने मोठी हानी टळली. सर्व जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *