Home » जळगाव » चाळीसगाव » तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ; चौघांविरोधात गुन्हा दाखल !

तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ; चौघांविरोधात गुन्हा दाखल !

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील वाक येथे वाहनाला धडक देत चौघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाक येथे दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राकेश पाटील हे गावात उभे असताना योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील, अक्षय बारकू पाटील हे (एमएच ४२, एयू ४१४९) क्रमांकाच्या वाहनातून त्याठिकाणी आले. त्यांनी राकेश पाटील याला ठोस मारली आणि त्यानंतर वाहनातून धारदार शस्त्रे काढून त्यांनी वार केले. यामध्ये राकेश पाटील यांच्या राकेश पाटील यांच्यावर वार केले.

यावेळी त्यांचे काका किशोर पाटील व वडील सुधाकर पाटील हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर देखील वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर काका सर्जेराव विक्रम पाटील, आई लिलाबाई सुधाकर पाटील, काकू जागृती पाटील, परमेश्रर सुधाकर पाटील यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी राकेश पाटील यांच्या तक्रारीवरुन योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील, अक्षय बारकु पाटील सर्व रा.वाक ता. भडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *