Home » जळगाव » तरुणाच्या खून प्रकरणी : चौघांना ठोकल्या बेड्या !

तरुणाच्या खून प्रकरणी : चौघांना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अशोक नगर भागात एका २७ वर्षीय तरुणाची शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन मुले असून यासंबंधी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी त्याची आई कोकिळाबाई भावसार यांनी शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अजय मंगेश मोरे याच्यासह चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर शनीपेठ पोलिसांसह एलसीबीची टीम तातडीने संशयित आरोपींच्या मागावर होती. एलसीबीच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा तपास पूर्ण करत चार जणांना अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीला हे आरोपी काही मित्रांकडे तर काही नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. अखेरीस, अजय मंगेश मोरे (वय २८, कासमवाडी, जळगाव) याच्यासह तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *