Home » जळगाव » मुलगा पसंत नसल्याने नववधु फरार !

मुलगा पसंत नसल्याने नववधु फरार !

जळगाव : प्रतिनिधी

कुटुंबियांनी ज्यासोबत लग्न ठरविले तो मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे लग्नाला चार दिवसांचा कालावधी शिल्लक असतांनाच उपवर मुलगी कॉलनीतील तरुणासोबत पसार झाली. समाजात बदनामी होईल या भितीमुळे कुटुंबियांनी उपवर मुलीच्या लहान बहिणीसोबत तरुणाचे लग्न लावून दिल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तरुण कामानिमित्त जळगावात नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. त्याचे कॉलनीत राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीसोबत प्रेमजुळले होते. काही महिन्यांपुर्वी ही तरुणी त्याच्यासोबत पळून गेली होती. मात्र काही दिवसानंतर ते घरी परतले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी नातेसंबंधातील तरुणासोबत मुलीचे लग्न ठरविले. मात्र तो मुलगा मुलीस पसंत नव्हता. घरात लग्नाची जय्यत तयारी मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आली. मुलीचे आई-वडील लग्नाच्या खरेदीसाठी गेलेले होते. त्यावेळी मुलगी मंडपातून गायब झाल्याचे त्यांना समजले.

खरेदी करुन घरी आलेलया आईवडीलांना मुलगी घरात न दिसल्याने त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र घरातून निघालेली उपवर मुलगी मिळून आली नाही. एकीकडे मुलीच्या लग्न चार दिवसांवर येवून ठेपले, त्यात मुलगी घरातून पळून गेल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी तरुणीच्या लहान बहिणीचे उपवराशी लग्न लावून दिल्याचे समोर आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *