Home » जळगाव » रात्री शतपावली करणे भोवले : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

रात्री शतपावली करणे भोवले : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतांना आता रात्री शतपावलीसाठी गेलेला तरुण रस्ता ओलांडत असतांना त्याला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये ईश्वर बबन पाटील (वय ३४, रा. गेंदालाल मिल) याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. ७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिलजवळील जैन मंदिराजवळ घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारे नरेंद्र मिस्तरी हे अहमदाबाद येथे हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून नोकरीस आहे. दि. ७ रोजी त्यांचा लहाणणीचा मित्र ईश्वर पाटील यांच्यासोबत ते रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेले होते. परिसरातील जैन मंदिराजवळील रस्ता ओलांडत असतांना ईश्वर पाटील यांना शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत होवून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी रामेश्वर पाटील हा कामावर जात असल्याने त्याला गर्दी दिसल्यामुळे तो थांबला. त्याला ईश्वर पाटील यांचा अपघात झाल्याचे समजात त्याने लागलीच किरण पाटील यांना बोलावून घेतले.

जखमी ईश्वर पाटील यांना रिक्षातून तात्काळ जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ फकिरा रंधे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *