Home » जळगाव » भुसावळ » स्वतःवर गोळी झाडून संपविली जीवनयात्रा !

स्वतःवर गोळी झाडून संपविली जीवनयात्रा !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील नमस्कार एका ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या हातात कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे भुसावळमधील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत होते. सोमवारी (दि.12) रोजी सकाळी त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई दीपनगर येथे गेले होते. त्याच दरम्यान, त्यांनी घरात एकटे असताना स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *