Home » जळगाव » तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत चेजिंगरुमध्ये केला बुरखा परिधान !

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत चेजिंगरुमध्ये केला बुरखा परिधान !

जळगाव : प्रतिनिधी

खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने पोलीस वेळीच दाखल होत त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याच महाविद्यालयात फरहान हकीम खाटीक हा तिसऱ्या वर्षाला शिकत होता. ते दोघ कॉलेजला एकाच बसने ये-जा करीत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी फरहान खाटीक हा तरुणीला सोशल मीडियावरुन मॅसेज करुन तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करीत होता. तो तरुणीला धर्म, जात असे काही नसून प्रेम प्रेम असते असे सांगत होता. त्यानंतर काही दिवसांनी फरहान याने तरुणीला प्रपोज करुन तू जर माझा प्रपोज स्विकारला नाही तर आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुण हा तरुणीसोबत सोशल मीडियावर चॅटींग करुन तीला एका धर्माबाबत व्हिडीओ टाकून तिला त्या धर्माबाबात आपुलकी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत होता. तरुणीने घाबरुन ही बाब कोणालाही सांगितली नाही.

तरुणीही ही कामानिमित्त बुधवारी सकाळी डीमार्ट येथे खरेदीसाठी आली होती. त्यावेळी संशयित फरहान व एक अनोळखी इसम तीचा पाठलाग करीत तेथे पोहचले. फरहान याने सोबत आणलेला बुरखा तरुणीला जबरदस्तीने परिधान करण्यास सांगितले, बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देखील त्याने दिल्यामुळे तरुणीने डीमार्टच्या चेजिंगरुमध्ये बुरखा परिधान केला. बुरखा परिधान केल्यानंतर संशयित फरहान याने माझ्यासोबत खरेदी कर असे म्हणत तरुणीला सोबत खरेदी केली. तरुणीने पैसे देण्याच्या काऊंटरवर बुरखा काढण्यास सांगितले असता, फरहान याने तू बुरखा काढला तर मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूचे लोकांनी हे वाक्य ऐकून त्यांना संशय आल्याने मोठा जमाव जमा झाला.

जमाव जमल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. याबाबत डायल ११२ वर कॉल आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यातील सपोनि संदीप पाटील, संदीप वाघ, सुधाकर अंभोरे, अतुल चौधरी, शरद वंजारी, सिद्धेश्वर डापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीसह दोघ तरुणांना त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *