Home » राष्ट्रीय » लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू कोर्टात जाणार !

लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू कोर्टात जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. यानंतर आता अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जात आहेत. यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी या योजनेसंदर्भात मोठी भूमिका घेत थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

“निवडणुकीत पात्र-अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. ही सरळ फसवणूक आहे. एकदा पात्र-अपात्रची सर्व कारवाई झाली की तेव्हा अपात्र महिलांना सोबत घेऊन आम्ही कोर्टात जाऊ, अपात्र महिलांना लाभ दिला कसा दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 50 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र केल्याचा आरोप केला जात आहे. ही सगळी लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहे,” असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, सरकारने पात्र लाडक्या बहिणींची यादी पडताळण्याचे काम हाती घेतले असून चारचाकी, शासकीय नोकरदार, अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचे नाव या योजनेतून हटवले जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर 11 वा हप्ता देखील मिळण्यास सुरुवात झाली असून लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16,500 रुपये मिळाले आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *