Home » जळगाव » तरुणाला नोकरी मिळाली : आईसह घरी येताच वाटेत दुर्देवी मृत्यू !

तरुणाला नोकरी मिळाली : आईसह घरी येताच वाटेत दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाला नाशिक येथे नोकरी मिळाल्यानंतर आईसह गावी परतत असताना आनंदा अशोक रजाने या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रेल्वेत आई त्याची वाट पाहत राहिली… पण काही वेळातच मुलाचा मृतदेहच तिच्या नजरेस पडला! ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी, ६ जून रोजी सकाळी आसोदा शिवारात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा येथील आनंदा रजाने हा तरुण नाशिक येथे मामाकडे आईसह कामाच्या शोधात गेला होता. तेथे एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. अवघ्या आठवडाभराच्या कामानंतर तो शुक्रवारी सकाळी आईसह गावी परतण्यासाठी रेल्वेने भुसावळ मार्गे निघाला. मात्र प्रवासातच, आसोदा शिवाराजवळ भुसावळ स्थानकावर उतरल्यावर तिने घटना रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली. तिची व्यवस्था जळगावला परत करण्यात आली आणि येथे आल्यानंतर तिने रेल्वे सुरक्षा बलाला घटनेची माहिती दिली. शोध घेतल्यानंतर आनंदाचा मतदेह सापडला.

आनंदा व त्याची आई हे भुसावळपर्यंत रेल्वेने प्रवास करत होते. त्याआधीच जळगाव रेल्वे स्थानक आले होते. आनंदाने आईला उतरावं का विचारलं, मात्र आईने सांगितलं की, “हे जळगाव आहे, आपल्याला पुढे भुसावळला जायचंय.” काही क्षणातच आनंदा अचानकपणे खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  आनंदा रजाने हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे दोन विवाहित बहिणी आहेत. अवघ्या आठवडाभराची नोकरी, त्यानंतर गावी परतताना झालेला दुर्दैवी मृत्यू आणि आईच्या डोळ्यांसमोर घडलेली ही घटना संपूर्ण गावात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *