Home » जळगाव » तिघांनी केली तरुणीची छेडछाड करीत लुटमारी !

तिघांनी केली तरुणीची छेडछाड करीत लुटमारी !

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी, खानका मदरसा परिसरात दि ७ जून रोजी एका २१ वर्षीय मजुरी करणाऱ्या तरूणीची तिघांनी छेडछाड, मारहाण आणि लुटमारी केली. या घटनेत आरोपींनी पीडितेला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या खिशातील ४-५ हजार रुपये लुटले.

घटनेच्या वेळी पीडितेच्या मदतीसाठी तीन महिलांनी पुढे येऊन तिला आरोपींच्या तावडीतून सोडवले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे भुसावळ शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *