Home » जळगाव » चौघांनी केली पतीसह पत्नीला जबर मारहाण !

चौघांनी केली पतीसह पत्नीला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

जून्या भांडणाच्या कारणावरुन आनंद भगवान पवार (वय ३०, रा. मोहाडीरोड, खुबचंद टॉवरजवळ) यांच्यासह त्यांच्या पत्नीला चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवजवळ घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवरजवळ आनंद भगवान पवार हा तरुण वास्तव्यास आहे. जून्या भांडणाच्या कारणावरुन दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे राजेंद्र पाटील यांनी वाद घालीत शिवीगाळ  केली. त्यावेळी प्रशांत पाटील हा लोखंडी रॉड घेवून त्याठिकाणी आला आणि त्याने आनंद पवार याला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात रॉड टाकून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आनंद पवार यांची पत्नी शितल पवार या आल्या असता, त्यांना देखील उज्वला पाटील व मीना पाटील यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत प्रशांत पाटील याने लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले.

या भांडणामध्ये शितल पवार यांच्या कानातील अडीच ग्रॅमची सोन्याची बाळी पडून गहाळ झाली. दरम्यान, पवार दाम्पत्याने तात्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित राजेंद्र पाटील, प्रशांत राजेंद्र पाटील, मीना राजेंद्र पाटील, उज्वला प्रशांत पाटील सर्व रा. खुबचंद साहित्या टॉवर मोहाडी रोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *