Home » राष्ट्रीय » बच्चू कडूंची तब्येत खालावली : शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारला सवाल !

बच्चू कडूंची तब्येत खालावली : शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारला सवाल !

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, दिव्यांगाना अनुदान मिळावे यांसह १७ मागण्या घेऊन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनला काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची तब्येत खालावली असून, त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. मात्र, ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. अशातच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मोठं विधान करत सरकाराला सवाल केला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी आपला जीव पणाला लावला आहे. गेल्या ६ दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनात ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.

तसेच सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे बघायला पाहिजे, असे म्हणत बच्चू भाऊंना रक्ताची उलटी झाली, अजून किती परीक्षा बघणार आहात, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा शेतबारा कोरा केला जाईल, असे वचन देऊन मते घेतली आहेत, असे देखील शेट्टी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघतली. ज्या कुचितपणाने त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे या प्रश्नाकडे बघतील असे म्हटले ती बाब अत्यंत संतापजनक आहे. सरकार अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या उपोषकर्त्याकडे बघणार असेल, तर त्याची प्रतिक्रिया समाजातून उमटले गरजेचे आहे, ज्यां संघटना आणि राजकीय पक्ष यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला, त्यांनी मिळून ही मागणी केवळ बच्चू भाऊंची नाही, तर शेतकऱ्यांची आहे, यासाठी १५ जूनला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *