November 9, 2026 11:38 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » ट्रक व चारचाकीचा भीषण अपघात : चिमुरडी ठार तर आठ जखमी !

ट्रक व चारचाकीचा भीषण अपघात : चिमुरडी ठार तर आठ जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था

हजहून येणाऱ्या तरुणीला घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात मालेगाव येथील अकरावर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सकाळी १० च्या सुमारास चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील फतेह मैदान भागातील नऊजण हजहून येणाऱ्या हाकसा मोहम्मद यासीन (२५) हिला मुंबईहून आणण्यासाठी कार (एमएच ४६, एन ६२४४) ने मुंबईकडे निघाले होते. चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ चालक अबुजर मोहम्मद याकुब (३२) यांचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच ०४, केयू ८७७४) जोरदार धडकली. यात उमैमा फिरदोस मोहम्मद यासीन हिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर सबिना साजिद अख्तर (५४), तुबा मुज्जमील हुसेन (३२), अबुजैद मोहम्मद याकुब (३५), मुज्जमील हुसेन मोहम्मद शाबीर (३०), जीआवर रहमान मोहम्मद यासीन (२०), अल्ताफ रहमान मोहम्मद यासीन (२३), कुरेशा मोहम्मद शाबीर (७०) व आमना मोहम्मद यासीन (४६) हे गंभीर जखमी झाले.

जखमींना तत्काळ चांदवडच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस कर्मचारी विक्रम बस्ते, शिवा शेळके व सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हवालदार अनिल शिरसाठ व कॉन्स्टेबल प्रदीपसिंग राजपूत अधिक तपास करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!