Home » जळगाव » दामदुप्पट करून देण्याचे आमिष देत वृद्धाला लुटले !

दामदुप्पट करून देण्याचे आमिष देत वृद्धाला लुटले !

पारोळा : प्रतिनिधी

वृद्धास बोलण्यात गुंतवून पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत दुचाकीच्या हॅण्डलला दीड लाख रुपये असलेली पिशवी अज्ञातांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चहूत्रे येथील आण्णा सकरू चव्हाण (७२) हे बुधवारी दुपारी पारोळा येथील बँकेत गेले होते. त्यांनी बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले आणि त्यांचे मित्र प्रल्हाद बंडू चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. चोरवड नाक्याजवळ ते धान्य घेण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी दीड लाख रुपये ठेवलेली पैशांची पिशवी दुचाकीच्या हॅण्डलला लावली होती. त्याच वेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या. त्यांनी आण्णा चव्हाण यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. त्याच क्षणी आण्णा चव्हाण यांना एक फोन आला आणि ते त्यावर बोलू लागले. या संधीचा फायदा घेत त्या अनोळखींनी दुचाकीला लावलेली पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. पिशवीतील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच, चव्हाण यांनी तत्काल पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *