पारोळा : प्रतिनिधी
येथील स्वामी नारायण नगरमधील ३२ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. भूषण सुभाष चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. १५ रोजी रात्री ११.३० वाजता आपल्या राहत्या घरालगत असलेल्या खोलीच्या स्लॅबचा कडीला सुती दोरीच्या साह्याने भूषण हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

त्यानंतर त्यास खाली उतरवून तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या बाबत आकाश सुभाष चौधरी याने दिलेल्या माहितीवरुन पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



