Home » जळगाव » चाळीसगाव » धक्कादायक : मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला !

धक्कादायक  : मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला !

भडगाव : प्रतिनिधी

शहरातील बाळद रस्त्यालगतचे गॅरेज उघडताना बाळद येथील एक तरुण तेथे आला अन् गॅरेज मालकाच्या मोबाईलवर आलेल्या इंस्टाग्रामवरील मेसेजबाबत राग अनावर झाल्याने त्या तरुणाने थेट त्याच्या डोक्यावर व मांडीवर चाकु हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या गॅरेज मालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण शंकर कोळी व त्याची पत्नी योगिता कोळी यांच्यात घरगुती कारणावरुन सुमारे १५ दिवसापूर्वी वाद झाले होते. या कारणावरुन योगिता कोळी ही तिच्या दोन्ही मुलींना घेवून त्यांच्या आई- वडीलांकडे निघून गेली होती. त्यानंतर प्रवीण कोळी हा योगिता कोळी यांच्या आई, वडिलांकडे गेला. तसेच त्याच्या दोन्ही मुलींना घरी बाळद खुर्द येथे घेवून आला होता. दरम्यान, योगिता कोळी यांनी महेश विश्वनाथ पाटील (वय २७) यांना मोबाईलवरुन माझ्या मुली घरी आल्यात का व व्यवस्थित आहेत काय, असे विचारले. तसेच योगिता कोळी यांनी महेश पाटील यांना या मुलींबाबत इस्टाग्रामवर मेसेज केला होता.

या इस्टाग्रामवरील मॅसेजबाबत प्रवीण कोळी याचा लहान भाऊ विवेक कोळी यास माहिती मिळाली. त्याचा राग आल्याने त्याने गावातील मुलांना महेश पाटील यास सोडणार नाही, असे तो सांगत होता. दरम्यान, सकाळी १० वाजता भडगाव बाळदरोड महेश पाटील हे गॅरेजवर दुचाकीचे काम करत होतो. त्यानंतर सुमारे अर्धा तासाने विवेक कोळी त्यांच्याजवळ आला व त्याने धारधार चाकुने पाटील यांच्या पाठीवर, मांडीवर, डोक्यावर वार करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाळद येथील मह-`श पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेक कोळी याच्याविरुध्द भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आ-हे. तर संशयित विवेक कोळी याला अटक करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. प्रदीप चौधरी करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *