Home » जळगाव » पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघात : ट्रक चालक गंभीर !

पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघात : ट्रक चालक गंभीर !

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील साकेगाव शिवारात शनिवारी पहाटे ३:३० वाजता भरधाव ट्रक व ट्रेलरचा अपघात झाला. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धीरजकुमार कमालकिशोरसिंह (वय ३८, रा. मुझफ्फरपूर, बिहार) हे पीव्हीसी पाईपचा ट्रेलर (क्र. एमएच ४०-एके ९१५१) चालवत भुसावळ मार्गे शेगावकडे  जात होते. दरम्यान, साकेगाव येथील महालक्ष्मी ट्रॅक्टर शोरूमजवळ त्यांच्या ट्रेलरला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. एमएच ३७-टी ४७७१) जबर धडक दिली. या अपघातात ट्रक चालक हर्षल काळे गंभीर जखमी झाला असून, तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी धीरजकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रक चालक हर्षल काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोकों संजय भोई करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *