Home » जळगाव » पोलीस अधीक्षकांचे आदेश : १९ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या !

पोलीस अधीक्षकांचे आदेश : १९ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव  जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये ६ सहायक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

या बदली प्रक्रियेत चार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश जारी झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे लागणार आहे. सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये अजयकुमार वाढवे यांची यवतमाळ येथून यावल, संजय निकुंभ पुणे शहरातून पाचोरा, नितीन पाटील यांची नाशिक येथून भुसावळ बाजारपेठ, गणेश फड यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, योगीता नारखेडे यांची मानव संसाधन विकास विभागातून एएचटीयू विभागात बदली झाली आहे तर पोलिस उपनिरीक्षकांमध्ये अशोक खेडकर यांची गोंदियाहून जळगाव शहर, अविनाश राठोड यांची रायगडहून रावेर, शांताराम देशमुख यांची जिल्हापेठ येथून पाचोरा, सुनील मोरे यांची यावलहून रावेर तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाचक समाधान गायकवाड यांची अमळनेरला बदली झाली आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कुणाल चव्हाण, पाचोरा येथील योगेश गणगे, अप्पर पोलिस अधीक्षकांचे वाचक सुनील चौधरी, तक्रार अर्ज शाखेचे मकसूद शेख आणि शनिपेठच्या प्रिया दातीर यांना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *