Home » जळगाव » हॉटेलमधील मॅनेजरवर प्राणघातक हल्ला : गुंडांनी केली तोडफोड !

हॉटेलमधील मॅनेजरवर प्राणघातक हल्ला : गुंडांनी केली तोडफोड !

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील साकेगाव येथील वरुण हॉटेलमधील मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करुन गुंडांनी तोडफोड व लुट केल्याची धक्कादायक घटना २३ जूनच्या रात्री घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुण हॉटेलचे मॅनेजर सुमित सुभाष इंगळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कुणाल अहिरे याने २२ जून रोजी मद्याची बाटली न दिल्याच्या रागातून २३ जूनला रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपले साथीदार सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी आणि इतर ८ ते  १० अनोळखी व्यक्तींसोबत हॉटेलवर हल्ला केला.

हल्लेखोरांनी मॅनेजरच्या डोक्यात काचेची बाटली फोडल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना ही मारहाण करत शिवीगाळ केली. यात हॉटेलचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर या तरुणांनी गल्ल्यातील २० ते २५ हजार रुपये लंपास केले आहेत. तर सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर मशीनही पळवून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गंभीर जखमी सुमित इंगळे यांचा जबाब पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे यांनी नोंदवला आहे. त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *