Home » महाराष्ट्र » ठाकरेंना नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का : विलास शिंदे शिवसेनेत दाखल !

ठाकरेंना नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का : विलास शिंदे शिवसेनेत दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत असल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसत असतांना आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील उद्धवसेनेला माजी महानगरप्रमुख असणार्या विलास शिंदे यांनी अखेर रामराम ठोकला. विलास शिंदे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा उद्धवसेनेसाठी एकाच महिण्यातील दुसरा धक्का आहे. या महिण्यात सुधाकर बडगुजरांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता विलास शिंदे यांनी शिंदेसेनेत प्रवेश घेतला असल्याने उद्धवसेनेला नाशकात मोठे भगदाड पडले आहे.

विलास शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसहित प्रवेश करताना आपली ताकद दाखवून दिली. प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरादार बॆटिंग केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदेंना उद्देशून, तिकडे काही शिल्लक ठेवले आहेस ? अशी विचारणा केली व हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी असल्याचा टोला उद्धवसेनेला लगावला.

गेल्या अनेक महिण्यांपासून विलास शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. साधारण महिनाभरापुर्वी विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. त्यानंतर विलास शिंदे हे शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी विलास शिंदेंनी या गोष्टीचा इन्कार केला होता. मात्र काहीच दिवसांमध्ये विलास शिंदेंनी आपली भूमीका बदलताना, शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *