November 15, 2026 9:01 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुण शेतकरी जागीच ठार !

भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुण शेतकरी जागीच ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतान आता जळगाव- चांदवड महामार्गावरील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या खडकी बु, या गावातून गेलेल्या महामार्गावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गावातील आबा जानराव (धनगर) (३५) हे गावातील भगवान कोल्हे (२६) याला सोबत घेऊन दुचाकीवरून शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत आबा जानराव याचा मृत्यू झाला. भगवान कोल्हे हा गंभीर जखमी झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच दिसत नसल्याचा फायदा घेत वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघात करणारे वाहन हे टेम्पो असल्याचे समजते. अपघातानंतर संतप्त झालेल्या खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जळगाव-चांदवड रस्ता आंदोलन करीत रोखून ठेवला. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पोलिस घटनास्थळी पोहचले.

जळगाव-चांदवड हा महामार्ग असताना हा रस्ता म्हणजे दरदिवसाला लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण देत आहे. एखाद्या वेळेस या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित प्रशासनाने या रस्त्याची नवनिर्मिती करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियमन व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी खडकी बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!