मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे एक विधान सोशल मीडियाद्वारे केले होते. त्यानंतर त्यांनी मी हिंदी किंवा मराठीच बोलणार असल्याचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या विधानाने केडिया यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

तसेच केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट आव्हान देणारे ट्वीट केले होते. त्यानंतर मनसैनिकांना उत्तर मिळणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मनसैनिकांनी मुंबईतील सुशील केडिया यांच अॅाफिस फोडलं असल्याची बातमी समोर आली आहे.
मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे ट्वीट सुनील केडिया यांनी एक्सवरून शेअर केले होते. त्यांचे हे विधान महाराष्ट्रातील मराठींना लोकांना डिवचणारे होते. या विधानानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भाषणा होण्यापूर्वीच खळखट्याक करत सुशील केडिया यांचं ऑफिस तोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर मराठी लोकांनी केडियांचा माज उतरवला अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहे.
सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.



