जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर पेठ अंतर्गत असलेल्या गोविंद नगरातील रहिवासी महेश अनिल गोल्हारे (१८) हा बारावीत शिक्षण घेता होता. घराच्याच बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शेतकरी अनिल कडूबा गोल्हारे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा महेश हा जामनेर येथील ललवाणी महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होता. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास महेश गोल्हारे याने घराच्याच बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास आवळला. घरच्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच हंबरडा फोडला. आजूबाजूच्या लोकांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. पश्चात आई-वडील. भाऊ-बहीण असा परिवार होय.



