Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळले : घटनास्थळी मोठा स्फोट !

मोठी बातमी : राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळले : घटनास्थळी मोठा स्फोट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले आहे. हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

रतनगड शहराजवळ हे लढाऊ विमान कोसळले. या घटनेची माहिती मिळतात तत्त्काळ शोध आणि बचावकार्य करण्यासाठी पोलिस पथके घटनास्थळी पाठवण्यात आली, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

या वर्षी जग्वार विमानाला झालेला हा दुसरा अपघात आहे. याआधी एप्रिलमध्ये गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित सरावादरम्यान भारतीय हवाई दलाचे एक जग्वार विमान कोसळले होते. हे विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावरील सुवर्दा गावाजवळ एका मोकळ्या जागेत कोसळले होते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *