Home » जळगाव » खळबळनक : मित्राच्या घरी नेत तरुणाने केला तरुणीवर अत्याचार !

खळबळनक : मित्राच्या घरी नेत तरुणाने केला तरुणीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तिला जळगावात बोलवून नेरीच्या तरुणाने एका खोलीमध्ये तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित अमोल राठोड (रा.नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील एका तरुणीची अमोल राठोड या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांचे नियमित मोबाइलवर बोलणे सुरू होते. १० जुलै रोजी, सकाळी अमोल राठोड याने तरुणीला जळगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलविले. मी शाळेत जात असल्याचे आईला सांगून ही तरुणी जळगावात आली. यावेळी हा तरुण हा मित्रासोबत तिला भेटण्यासाठी आला. नंतर तो तरुणीला मित्राच्या घरी घेऊन गेला. मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले असता, अमोल हा तरुणीशी जबरदस्ती करू लागला.

मात्र, तरुणीने त्यास नकार दिला. त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो तिला भाड्याने घेतलेल्या खोलीवर घेऊन गेला. तेथे तरुणीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतर, तरुणीला मित्राच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला. तरुणीने तिच्या मैत्रिणीला कळविले. तरुणीचे नातेवाईक हे जळगावात आले व तिला शिरपूर येथे घेऊन गेले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि. संजय तडवी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *