Home » जळगाव » मध्यरात्री आयुष्य संपविले दुपारी खोली आढळला मृतदेह !

मध्यरात्री आयुष्य संपविले दुपारी खोली आढळला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी

खोलीचा दरवाजा आतून बंद करीत रात्री झोपलेल्या नानक कन्हैयालाल सोढाई (वय ३७, रा. नेहरुनगर) यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास नेहरु नगरात घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरु नगर परिसर नानक कन्हैयालाल सोढाई (वय ३७) हे वास्तव्यास होते. रविवारी रात्री ते आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करुन झोपले होते. सोमवारी दुपार झाली तरी त्यांनी खोलीचा दरवाजा न उघडल्याने त्यांच्या भावजयीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. यावेळी त्यांना नानक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी दुकानावर गेलेल्या पतीला घटनेची माहिती दिली.

त्यानुसार नानक यांचा भाऊ हे लागलीच घरी आले. त्यांनी नानक सोढाई यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *