Home » महाराष्ट्र » ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला : सरकारमधील मंत्र्यांची भांडणं-लफडी बाहेर येताहेत !

ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला : सरकारमधील मंत्र्यांची भांडणं-लफडी बाहेर येताहेत !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांसह आमदारांचे पराक्रम बाहेर येत असतांना त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत, ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सामनासाठी मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, ‘‘मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही.’’ उद्धव ठाकरे यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्याबद्दल मोदी सरकारला ‘जाब’ विचारला, ‘‘26 भगिनींचे कुंकू पुसले व अतिरेकी गायब झाले. हे सरकारचे अपयश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ कोणाच्या दबावाखाली मागे घेतले ते देशाला सांगा.’’

मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असेल का? यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढणार आहोत. महाविकास आघाडी असेल का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं. तर त्यांचं म्हणणं आहे की, कदाचित ते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. ठीक आहे. तसं असेल तर तसं करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि मराठी माणसाचा भगवा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *