Home » जळगाव » शुभांगी नाईक मृत्यू प्रकरण : पतीविरोधात गुन्हा दाखल !

शुभांगी नाईक मृत्यू प्रकरण : पतीविरोधात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

मेहरुण परिसरातील शुभांगी कुणाल नाईक या मृत्यूप्रकरणी विवाहितेच्या तिचा पती कुणाल रवींद्र नाईक (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने शनिवारी (१९ जुलै) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. या प्रकरणात विवाहितेचे वडील राजेंद्र भागवत वाघ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यात म्हटले आहे की, शुभांगीचा पती कुणाल याने तिला वारंवार मारहाण करून व शिवीगाळ करून तिचे जगणे कठीण केले व तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *