Home » जळगाव » पारोळ्यात खळबळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती : एका विरोधात गुन्हा दाखल !

पारोळ्यात खळबळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती : एका विरोधात गुन्हा दाखल !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यात १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली असून पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना तिची पारोळा बसस्थानकावर एका मुलासोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून शहरातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला.

हा प्रकार फेब्रुवारी २०२५मध्ये घडला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेत तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार केला. गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. मुलीच्या आईने तात्काळ पारोळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *