Home » जळगाव » भुसावळात खळबळ : महिलेवर तिघांनी केला सामुहिक अत्याचार !

भुसावळात खळबळ : महिलेवर तिघांनी केला सामुहिक अत्याचार !

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एका ३५ वर्षीय महिलेला जंगलात नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.

पीडित महिला ही आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जवळच जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *