Home » राज्य » खळबळजनक : पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल ; पतीने घरातच लावले कॅमेरे !

खळबळजनक : पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल ; पतीने घरातच लावले कॅमेरे !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या आठवड्यापासून राज्यात सध्या अधिकारी आणि राजकारण्यांचा हनीट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरे बसवले. या कॅमेराच्या माध्यमातून या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर नजर ठेवणे सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या अंघोळीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल देखील केले. यानंतर पत्नीने आपल्या क्लास वन अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत क्लास वन अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्यासाठी दीड लाखांची मागणी करत मानसिक छळ करत असल्याचे अधिकारी पत्नीने सांगितले. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

सन 2020 मध्ये पीडितेचा संबंधित क्लास वन अधिकाऱ्यासोबत विवाह झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत आणि आनंदात सुरू झाला. मात्र काही काळातच पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे वागणे अधिक त्रासदायक बनत गेले. पती वारंवार पैशांची मागणी करत होता आणि त्यासाठी पत्नीवर मानसिक दबाव टाकत होता. यासोबतच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने घरात गुप्त स्पाय कॅमेरे बसवले. ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या पत्नीवर हा अधिकारी आपल्या पत्नीवर नजर ठेवायचा. इतकेच नव्हे तर या अधिकाऱ्याने बाथरूममध्ये देखील स्पाय कॅमेरे बसवले. या माध्यमातून पत्नीचे अंघोळीचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले असल्याचे समोर आले आहे. अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. तसेच गाडी आणि घरच्या हप्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी जबरदस्ती सुरू केली.

आपल्याला पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली आहे. यामध्ये स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *