पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अनेक नेते चर्चेत येत असतांना आता पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.

सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांचे नेते गत काही दिवसांपासून सातत्याने वादात सापडत आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात पत्ते खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकारची सर्वत्र छी थू होत असताना आता रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने चक्क कलाकेंद्रात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत? हे शोधण्याऐवजी पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.
दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये केली आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात कलाकेंद्रात धुडगूस घालणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः या घटनेत एक तरुणी जखमी झाल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



