Home » जळगाव » चाळीसगाव » चाळीसगाव : ५४ वर्षीय महिलेचा सर्पदंशानंतर दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव : ५४ वर्षीय महिलेचा सर्पदंशानंतर दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ५४ वर्षीय महिलेचा सर्पदंश झाल्यानंतर उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील हिरकनबाई सुपडू बेलेकर (वय ५४) या शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतात काम होत्या. काम करत असताना हिरकनबाई बेलेकर यांना ५ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांना सायंकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हि घटना २३ जुलैला खडकी बुद्रुक येथे घडल्याचे ग्रामपंचायत सदस्य नाना तांबे यांनी कळवले आहे. दरम्यान, हिरकनबाई बेलेकर यांच्या पश्चात पती, २ मुले, मुलगी, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावर २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या सुपडू बाबुराव बेलेकर यांच्या पत्नी तर महेश व भूषण बेलेकर यांच्या मातोश्री होत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *