Home » जळगाव » चक्कीच्या पट्ट्यात अडकली बालिकेची ओढणी मानेचे हाड तुटून जखमी !

चक्कीच्या पट्ट्यात अडकली बालिकेची ओढणी मानेचे हाड तुटून जखमी !

जळगाव : प्रतिनिधी

ओढणी चक्कीच्या पट्ट्यात अडकून गळफास बसून मानेचे हाड तुटून मिस्बा बी. शेख साबिर (वय १२, रा. नशिराबाद, ता. जळगाव) ही गंभीर जखमी झाली. ही घटना दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास भवानीनगरात घडली. याप्रकरणी चक्कीचालक सुरेश एकनाथ चौधरी, दीपक एकनाथ चौधरी (दोघ रा. स्वातंत्र्य चौक, नशिराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भवानी नगरात शाकीर शेख साबिर हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास त्याची लहान बहिण मिस्बाबी शेख साबिर ही संकट मोचन नावाच्या चक्कीवर दळण दळण्याकरीता गेली होती. यावेळी चक्की मालक सुरेश चौधरी व दीपक चौधरी यांनी चक्कीच्या पद्याला कोणतीही सुरक्षा उपकरण लावलेले नव्हते. त्यामुळे मुलीची ओढणी चक्कीच्या पट्ट्यात अडकून तीला गळफास बसला. त्यामुळे तिच्या मानेचे हाड तुटून गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात तक्रार दाखल झाली असून त्यानुसार चक्कीचालक सुरेश एकनाथ चौधरी, दीपक एकनाथ चौधरी (दोघ रा. स्वातंत्र्य चौक, नशिराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *