Home » जळगाव » आईसह अल्पवयीन मुलीचा केला तरुणाने विनयभंग !

आईसह अल्पवयीन मुलीचा केला तरुणाने विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावामधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह त्याचा जाब विचारणाऱ्या आईचाही तरुणाने विनयभंग केल्याची घटना दिनांक २७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. भूषण सोपान पाटील (रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे वडील शाळेत सोडायला जात असताना भूषण पाटील याने मुलीकडे पाहून अश्लिल हावभाव केले. या विषयी मुलीच्या आई-वडिलांनी जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भूषण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले.  पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *