Home » जळगाव » पाच मजली इमारतीवरुन पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू

पाच मजली इमारतीवरुन पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील दीपनगर येथे सुरु असलेल्या सहाशे केव्ही वॅट क्षमतेच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडून पप्पु अखायत्या बिलाला (वय २०, मूळ रा. मांडवी, तहसील झिरन्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या परप्रांतीय मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वसाहतीमध्ये सहाशे के.व्ही. वॅट क्षमतेच्या नवीन निवासी इमारतीच्या पाच मजली इमारतीचे काम सुरु आहे. त्याठिकाणी मध्यप्रदेशातील पप्पू बिलाला हा गेल्या पंधरा दिवसांपासून त्याचा मामा केरीया भलजी बिलाला याच्यासोबत दीपनगर येथे गवंडी काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो शनिवारी सकाळी ८ वाजता कामावर गेला होता. पाचव्या मजल्यावर काम करीत असतांना पप्पूचा अचानक पाय घसरुन तो खाली कोसळला. ही घटना त्याच्यासोबत काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच रुग्णवाहिकेला पाचारण केले. यावेळी जखमी पप्पू बिलाला याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वसाहती मध्ये नवीन निवासी इमारतीच्या पाच मजली इमारतीचे काम सुरु आहे. मात्र मजूरांना कोणत्याच प्रकारच्या सुरक्षा बाबत सोयी सुविधा नसल्याने मंजूरांचा मृत्यू होत आहे. मात्र प्रशासन व ठेकेदारा याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. ठेकेदावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *