Home » जळगाव » अमळनेर » धक्कादायक : चारचाकीने धडक दिल्यानंतर युवकास मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा

धक्कादायक : चारचाकीने धडक दिल्यानंतर युवकास मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील तांबेपुरा भागात युवकाला चारचाकीने धडक देत नंतर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, तांबेपुरा येथील शिवशक्ती चौकात जयेश राजेंद्र पाटील (तांबेपुरा) हा ३० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता आपल्या मित्रांसोबत उभा असताना अचानक एका चारचाकीने त्याला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर गाडीतून उतरलेले राजवीर आणि त्याची आई सोनी (पूर्ण नाव माहित नाही) यांनी लोखंडी रॉड आणि हाताबुक्क्यांनी जयेशला मारहाण केली. त्यानंतर राजवीरचा मामा करतारसिंग यांनीही मारहाण करत जयेशला जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *