रावेर : प्रतिनिधी
निंभोरा बु.येथील वाघोदा रस्त्यावरील मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दि.३१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या आधी मुकेश उर्फ विजय याने आपल्या पत्नीला मोबाईलवर मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून त्यांच्या राहत्या घराजवळच्या जुन्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

यावेळी निंभोरा पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच तत्काळ तपास करीत आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला मात्र जुन्या घरातच तो गळफास घेतलेला आढळून आला. त्याचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधी संस्कार करण्यात आले. दरम्यान त्याच्या मोबाईल सोबत एक सुसाईड नोट मुकेश याने लिहून ठेवली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी या सुसाईड नोटमध्ये काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निंभोरा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोनी हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभय ढाकणे करीत आहेत.



