Home » जळगाव » चाळीसगावात लाचखोरीचा पर्दाफाश; तलाठीसह तिघांना २५ हजारांची लाच घेताना अटक

चाळीसगावात लाचखोरीचा पर्दाफाश; तलाठीसह तिघांना २५ हजारांची लाच घेताना अटक

चाळीसगाव : प्रतिनिधी

वडिलोपार्जित शेतजमिनीवरील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या कामासाठी २५ हजारांची लाच स्विकरणाऱ्या चाळीसगाव तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहीम (वय २९) यांच्यासह रोजगार सेवक वडीलाल रोहीदास पवार (वय ४०) व दादा बाबू जाधव (वय ४०) या तिघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मौजे पाथरजे, ता. चाळीसगाव येथील शेतीच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्या कामासाठी तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहीम यांनी रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार यांच्या मार्फत २५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. या व्यवहारात दादा बाबू जाधव याने तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने दि. ३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तपासणीदरम्यान संशयितांकडून लाचेची स्पष्ट मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचला.

पथकाने रचलेल्या सापळ्यात वडिलाल पवार यांनी तलाठी दिलशाद मोमीन यांच्या वतीने तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *