Home » जळगाव » खळबळजनक : जवानाचा मोबाइल हॅक करून आठ लाखांत फसवणूक !

खळबळजनक : जवानाचा मोबाइल हॅक करून आठ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. विजय चिंधा राजपूत (४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे मोबाइलचा ताबा घेत परस्पर राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेत सायबर गुन्हेगाराने रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील विजय राजपूत हे भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखीने संपर्क साधून सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का, असे विचारले. त्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर हा प्रकार घडला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *