यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अंजाळे गावाजवळ रविवारी दुपारी एका अज्ञात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हे तिघेही भुसावळचे रहिवासी भुसावळहून यावलकडे येत असताना हा अपघात घडला.

सविस्तर वृत्त असे कि, इरफान मुस्ताक बागवान (४५), दानिश मोहम्मद बागवान (२५) आणि सईद शकील बागवान (४९) हे तिघे त्यांच्या दुचाकीवरून (एम.एच. १९ ई.एम. ६७३१) यावलकडे येत होते. याचवेळी लहान पाटचारीजवळ एका अज्ञात डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच अंजाळे येथील आनंद सपकाळे, तुषार पाटील, विक्की कोळी आणि अजय भोई यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावल पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनेजखमींना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान इरफान बागवान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला



