यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी या गावातील माहेर असलेली एका २८ वर्षीय विवाहितेचा माहेरून पतीला मोटरसायकल घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे म्हणून दोघांनी छळ केला. ही घटना एप्रिल २०१३ पासून ते जुलै २०२५ दरम्यान घडली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या काजल रवींद्र ढमढेरे वय २८ या विवाहितेने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह २८ एप्रिल २०१३ रोजी रवींद्र नामदेव ढमढेरे (रा. बोरव्हीर ता. जि. धुळे) यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर पती रवींद्र ढमढेरे व सासू उषाबाई नामदेव ढमढेरे या दोघांनी विवाहितेकडे पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून दगादा लावला. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. आणि माहेरी सोडून दिले. तेव्हा या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहील गणेश करीत आहेत.



