जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री मित्राच्या घरी जावून घरात गोळीबार करुन पसार झालेला दीपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी) याच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे नगरात राहणाऱ्या सरला सपकाळे यांच्या पतीचा मित्र दीपक तरटे हा गेला होता. त्याने गोळीबार केल्यानंतर तो तेथून पसार झाल्याची घटना दि. ७ रोजी घडली. होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित दीपक तरटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या शोधार्थ पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सुर्यवंशी, योगेश बारी, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील यांचे पथक तयार केले होते.
पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयित दीपक तरटे हा रामेश्वर कॉलनीत असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. त्याला न्यायालयाने दि. ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच संशयिताविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.



