जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय नेहमीच अनेक वादात सापडत असतात आता पुन्हा एकदा मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक चक्क मद्यधुंद अवस्थेत असताना आमदार चंद्रकांत पाटलांनी त्या सुरक्षारक्षकाची झिंग उतरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आ.चंद्रकांत पाटील यांनी अचानक भेट दिली असता या ठिकाणी एक सुरक्षारक्षक चक्क दारूच्या नशेत कर्तव्य बजावीत असताना त्याला आ.पाटील यांनी बोलत असताना तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आ.हे त्यामुळे आ.चंद्रकांत पाटील चांगलेच संतप्त झाले होते. या सुरक्षारक्षकाने आ.पाटील यांनी विचारले असता त्याने दारू पिली असल्याचे देखील मान्य केले आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना देखील कळविल्या असल्याचे बोलण्यात आले. यासोबतच आ.चंद्रकांत पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील धारेवर धरले. उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सुरक्षारक्षक चक्क दारूचा नशेत येत असेल तर त्याच्याकडून चुकीने काही अनुचित प्रकार घडला तर याला कोण जबाबदार हे देखील महत्त्वाचे आहे या सुरक्षारक्षकाच्या कंत्राटदारावर कारवाई होणार का हा देखील प्रश्न आता विचारला जात आहे.



