Home » ताज्या » ‘जर तुम्ही मला पैसे मागितले तर मी आत्महत्या करून तुमचे नाव फसवेल !

‘जर तुम्ही मला पैसे मागितले तर मी आत्महत्या करून तुमचे नाव फसवेल !

जळगाव : प्रतिनिधी

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने पैसे न देता उलट आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी अब्दुल हाफीज शेख मुनाफ उर्फ सिंगर (रा. उस्मानिया पार्क) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शेख शकील शेख जमील (४६, रा. शनिपेठ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अब्दुल हाफीज शेख मुनाफ याने त्याच्या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी गरजूंना प्रति व्यक्ती २०० रुपयांमध्ये स्कूल बॅग, पेन्सिल, सायकल अशा वस्तू देण्याचे सांगितले होते. त्यासाठी शेख शकील यांनी अब्दुल हाफीज शेख मुनाफ यास ऑनलाइन पद्धतीने एक हजार ४०० रुपये पाठविले होते. मात्र संबंधिताने साहित्य दिले नाही. त्यामुळे शेख शकील यांनी पैसे परत मागितले. त्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीला व्हाट्स् अॅपवर मेसेज व व्हाईस रेकॉर्डिंग पाठवून ‘जर तुम्ही मला पैसे मागितले तर मी आत्महत्या करून घेईल व तुमचे नाव फसवून टाकेल’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी अब्दुल हाफीज शेख मुनाफ विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *