November 9, 2026 9:46 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » एक्सप्रेसवेवर काळाचा घाला: सोशल मीडिया स्टारचा अपघातात मृत्यू,

एक्सप्रेसवेवर काळाचा घाला: सोशल मीडिया स्टारचा अपघातात मृत्यू,

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ क्रूझरचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अवघ्या २२ वर्षांच्या इन्फ्लूएन्सरला आपला जीव गमवावा लागला आहे. असफिया बानो मोहम्मद फरीद खान असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. हा अपघात पनवेलजवळ झाला आहे.

असफिया खान ही उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील रहिवाशी आहे. ती मित्रांसोबत फिरण्यासाठी मुंबईला आली होती. त्यांची गाडी लोणावळ्याला निघाली होती, त्यावेळी पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. या अपघातातील जखमींना कपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अवघ्या २२ वर्षांच्या असफिया हिला आपला जीव गमावावा लागला आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होती. तिचे सोशल मीडियावर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी होती. १५ दिवसांपूर्वी ती आपल्या मित्रांसह टोयोटा क्रूझर गाडीतून मुंबईत आली होती.

रविवारी मध्यरात्री ती आणि तिचे मित्र मुंबईहून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी काळाने गाठलं आणि भीषण अपघाताची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अपघातात चक्काचूर झाला आहे. चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद (वय २४), मोहम्मद अरिफ मोहम्मद आझम (वय २४) आणि रिझवान खान (वय २६) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, असफियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॅाक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एअरबॅग्जमुळे इतर चार जणांचा जीव वाचला, मात्र असफिया हि मागच्या सीटवर असल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिला आपला जीव गमावावा लागला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!